ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला खरमरीत पत्र; केले ‘हे’ गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. तब्बल ४ पानी पत्र लिहीत ठाकरे गटाकडून १२ मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले आहे.

निवडणूक आयोग आम्हाला सापत्य वागणूक देत आहे. आम्ही दिलेले चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगानं जाणून-बुजून दुसऱ्या बाजूला कळतील, अशा पद्धतीनं वेबसाईटवर टाकले,त्यामुळे शिंदे गटाला आमची रणनिती समजली असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. आमचं पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतचे पर्याय आधीच कसे काय उघड झाले, असा सवालही ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला केला.

शिंदे गट अंधेरी पोटनिवडणूक लढवत नसतानाही त्यांच्यासाठी आमचं चिन्ह रद्द केलं. शिंदे गट निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर देखील कागदपत्र देत नाही. मात्र, आम्ही दिलेली कागदपत्रं शिंदे गटाला दिली जातात असा आरोप ठाकरे गटाकडून या पत्राद्वारे करण्यात आला आहे. आमच्याच यादीतील चिन्ह आणि नावाचे पर्याय शिंदे गटानं कसे सादर केले? निवडणूक आयोगाच्या मदतीमुळंच हे सगळं शक्य झालं असा थेट आरोप ठाकरे गटाने केले आहेत.