मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार, महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ आणि अराजक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार हे नक्क्की, फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवतात हे पाहायचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ आणि अराजक कधी माजला नव्हता असं म्हणत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल-

मुख्यमंत्रीपदासाठी विखे-पाटलांचे नाव तर कधी अजित पवाराचे नाव चर्चेत आणले जाते आहे. या दुखाने बेजार झालेले फडणवीस “सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशा परमोच्च अवस्थेला पोहोचले आहेत. ही अवस्था म्हणजे बेधुंद नशेचे शेवटचे टोक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता खेळ खंडोबा गेल्या आठेक महिन्यात झाला व त्यात राज्य लवास गेले आहे. राज्य कसे चालले आहे? तेसुद्धा गमतीचेच आहे. पंतप्रधान मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणारे एक पत्र कुण्या अज्ञाताकडून लिहिण्यात आले. तेसुद्धा भाजपचे राज्य नसलेल्या केरळातून त्या पत्रामुळे इतकी खळबळ माजवली गेली की, संपूर्ण केरळ देशातील सुरक्षा यंत्रणांना व शेवटी मन भरकटलेल्या जॉन’ नामक पत्रलेखकास अटक केली. अशा तऱ्हेने एक मिशन फते झाले, पण श्रीसेवकांच्या मृत्यूवर यापैकी कोणीही बोलायला तयार नाही.

पैशाच्या व सत्तेच्या नशेत राज्य सरकार चूर असून महाराष्ट्र राज्य त्या नशेत झोकांडया खात आहे. मिथे गट मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यात दंग आहे तर फडणवीस गट वरून गोडबोलेपणाचा आव आणत पाठीमागून वेगळाच ताव मारीत आहे. हा ताव काय व कसा ते विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं आहे. शिंदे- मिथे गटाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर नांदण्याचे नाटक करायचे व प्रेमसंबंध आणखी कुणाबरोबर ठेवायचे. सध्याच्या राजकारणात कोणीही कोणाला डोळा मारतो तो असा है सौ. अमृतावहिनीसाहेबानी सागितले ते यासाठीच.

शेजेवर मिंध्याचा पण मनात फडणवीस हा काय संसार झाला? पण या संसारात आता कुणी तिसरा चौथा घुसत आहे. किंवा घुसवला जात आहे यावर मिंधे गटाचे प्रवक्ते गोगावले सांगतात, आमच्या मनात मिंधेच, दिल्लीत तशी कमिटमेंट आहे. श्रीमान गोगावले असेही म्हणतात की, “अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत . पवार मुख्यमंत्री होणे शक्य नाही. पवारांना काय करायचे आणि काय नाही हे ठरवणारा मिंधे गट कोण? गोगावले हे काय पवारांचे वकील आहेत? काही असो याचे विसर्जित होणार हे नक्की फक्त आता पाटावर कोणता गणपती बसवतात हे पाहायचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ आणि अराजक कधी माजला नव्हता असं सामनातून म्हंटल आहे.