मुंबई प्रतिनिधी | हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला . बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धमाल केली प्रेक्षकांची चित्रपटगृहांबाहेर गर्दी उसळी आहे . हिंदी व मराठी दोन्ही भाषेतील या चित्रपटासाठी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात तब्बल सोळा कोटींची कमाई केली असून चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल सहा कोटींची कमाई केली.
भारतात ‘ठाकरे’ हा चित्रपट दोन हजार तर परदेशात सहाशे थिएटरमध्ये दाखविण्यात येणार आहे . या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी साकारली आहे . या चित्रपटातील नवाजुद्दीनच्या अभिनय कौशल्याचे प्रेक्षकांतर्फे कौतुक करण्यात येत आहे . तर अमृता रावने माँसाहेब म्हणजेच मिनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी २० कोटी रुपये खर्च करुन या चित्रपटाची निर्मिती केली. तर अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शक पदाची धुरा सांभाळली आहे. बहुचर्चित ठरलेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत लोकप्रियता मिळविली असून बॉक्स ऑफिसवर १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही ट्विट करत ही माहिती दिली.
इतर महत्वाचे –
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?