हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Thane Real Estate । मुंबईचे प्रवेशद्वार म्हंटल जाणाऱ्या ठाण्याचा मागच्या काही वर्षात मोठा कायापालट झाला आहे. अनेक पायाभूत सुविधा, वाहतुकीच्या व्यवस्था आणि थेट मुंबईला जोडले जाणारे प्रकल्प यामुळे ठाण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला सुद्धा मोठी उभारी मिळाली आहे. एका अहवालानुसार, मागच्या ३ वर्षात ठाण्यातील मालमत्तेच्या किमती तब्बल ४६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ठाण्यात घरे घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे ठाणे हे एक प्रमुख रिअल इस्टेट हॉटस्पॉट म्हणून वेगाने वाढत आहे.
ठाणे-बोरिवली बोगदा, ठाणे-नवी मुंबई एलिव्हेटेड कॉरिडॉर, येणाऱ्या काळात सुरु होणाऱ्या मेट्रो रेल्वे, ५९,००० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधामुळे ठाण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राला (Thane Real Estate) मोठा फायदा होताना दिसतोय. त्यातच मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्रांशी कनेक्टिव्हिटी सुधारल्याने ठाण्याकडे खरेदीदारांचा कल वाढला आहे. परिणामी घराच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत ठाण्यातील घराची सरासरी किंमत प्रति चौरस फूट सुमारे १३,५५० रुपये होती. मात्र आता जून २०२५ च्या अखेरीस, ही किंमत प्रति चौरस फूट सुमारे १९,८०० रुपये झाली आहे. Thane Real Estate
1 BHK किंवा 2 BHK ला जास्त पसंती- Thane Real Estate
ठाण्यात सर्वाधिक घरांची विक्री हि 1 BHK किंवा 2 BHK युनिटची होत आहे. २०२० ते २०२५ पर्यंत नवीन पुरवठ्यापैकी सुमारे ४५% लोकांनी २ BHK घर खरेदी केलं तर ४२% लोकांनी १ BHK घर खरेदी करण्यास पसंती दाखवली. त्याचवेळी ३ बीएचके आणि ४ बीएचके सारखी मोठी घरे खरेदी करण्याचा आकडा हा केवळ १३% आहे. ८० लाख ते १.६ कोटी रुपयांदरम्यान घर खरेदी करण्यास लोकांनी जास्त उत्साह दाखवला आहे. मुंबईच्या तुलनेत या किमती खूपच कमी आहेत. उदाहरणार्थ, ६५० चौरस फूट सरासरी कार्पेट एरिया असलेल्या २ बीएचकेची किंमत ठाण्यात सुमारे १.२५ कोटी रुपये आहे, तर मुंबईच्या मध्यवर्ती उपनगरांमध्ये त्याच युनिटची किंमत २ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
आणखी एक बाब म्हणजे ठाण्यातील जमिनी आता कमी होत असल्याने बिल्डर उंचच उंच इमारती बांधून कमी जागेत जास्तीत जास्त फ्लॅट उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यात आता ४० मजल्यांपेक्षा जास्त उंचीचे ८९ निवासी टॉवर आहेत. यातील सुमारे ४७% ग्रेड ए डेव्हलपर्सचे आहेत ज्यामुळे खरेदीदारांना अधिक विश्वासार्ह पर्याय मिळतात.




