हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. पण, ज्या पत्रावरून राज्यात एवढी मोठी खळबळ उडाली. त्या पत्रावरच शंका उपस्थित केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडू पत्राबात शंका उपस्थित करण्यात आली होती. पण यावर आता परमबीर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना परमबीर सिंग यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवेलं पत्र माझ्याच ई-मेल आयडीवरुन पाठवलं आहे. परमबीर सिंग यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वातावणर आणखी तापण्याची शक्यता आहे. यावर मुख्यमंत्री कार्यालायाकडू काय स्पष्टिकरण येतेय हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
The letter to Maharashtra CM was sent from my email ID, says Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh
— ANI (@ANI) March 21, 2021
उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा – नारायण राणे
परमबीर सिंग यांनी वसुलीची माहिती ठाकरे यांना दिली होती. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी देशमुख यांच्यावर कारवाई का केली नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री ठाकरे यांचासुद्धा १०० कोटी वसुली प्रकरणात संबंध आहे. एक तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा