कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्हयातील कसबा तारळे येथील एका १७ वर्षीय कॉलेज युवतीचा मृतदेह मंदीरात घंटेला बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तरुणीचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने परिसरासह जिह्यात एकच खळबळ उडाली होती. पोलीस चौकशीत मृतक तरुणीचे नाव कौसर नासिर नायकवडी असं असल्याचे कळाले होते. या तरुणीचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला होता त्यानुसार प्रथमदर्शी या तरुणीने स्वतः गळफास लावून घेतल्याची शक्यता वर्तवली जात होती.
विशेष म्हणजे तरुणीच्या वाढदिवसादिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने ही आत्महत्या की घातपात अशी कुजबुज परिसरात चालू होती. परंतु आता हा घातपात नसून आत्महत्या असल्याच शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट झालं आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिल आहे. कौसर नासिर नायकवडी या तरुणीने ओढणीने मंदिरात गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलीस तपासात कौसरच्या ८ मित्र-मैत्रिणींना संशयित म्हणून ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिली.