औरंगाबाद – दुबईहून शहरात परतल्यानंतर ओमिक्रोन बाधित आढळलेल्या 33 वर्षीय तरुणाचा सोमवारी मध्यरात्रीनंतर कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे या तरुणाला आज मेल्ट्रोन रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असून, सात दिवस होऊन कारण टाईम केले जाईल, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.
दुबईहून परतल्यानंतर 33 वर्षीय तरुण कोरोना बाधित आढळला होता. त्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतला होता. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी खासगी लॅबमध्ये पुन्हा कोरोना तपासणी केली. त्यात त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु त्याच दिवशी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला पुन्हा भरती करण्यात आले होते.
सोमवारी तपासणीसाठी त्याचा पुन्हा एकदा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे या रुग्णाला सुट्टी द्यायची की उपचार सुरू ठेवायचे यासंदर्भात राज्याकडून निर्देश मागवण्यात आले. त्यानंतर त्याला आज सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. अहवाल निगेटिव्ह आल्याने या तरुणाला ओमिक्रोनमुक्त म्हणता येईल असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.