टीम हॅलो महाराष्ट्र। काल मुंबईत जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून गेट वे ऑफ इंडियावरील निदर्शनात ‘फ्री काश्मीर’ असा फलक घेऊन उभ्या असलेल्या एका तरुणीचे छायाचित्र माध्यमात प्रसारित झाले होते. या फलकावरूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे पोस्टर काश्मीरला काही बंधनांमधून मुक्त करा, या मागणीसाठी होते असा दावा केला आहे. तसेच जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना संजय राऊत यांनी रात्रीच्या अंधारात चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर जातात अशा शब्दांत भाजप सरकारवर टीका केली आहे.
र”कलम ३७० जम्मू-काश्मीरमधून काढल्यानंतर तेथील ट्रेन सेवा निलंबित करण्यात आली आहे. काश्मिरमधील काही सरकारी कार्यालये आणि रुग्णालये वगळता इंटरनेट सेवा बंद आहे. तेथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तेथील इंटरनेट सेवा पुर्वव्रत करा. तसेच तेथील विध्यार्थी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवा असं स्पष्टीकारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता काश्मीरबाबतच्या पोस्टरबाबत केलं आहे. .