‘या’ ५ स्वदेशी कंपन्यांमध्ये चीनची सर्वाधिक गुंतवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । चीनमधील अनेक कंपन्यांनी भारतातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते कि, चीनने सामरिक आघाडीबरोबरच भारतात आर्थिक आघाडीवर कसे पाय घट्ट रोवले आहेत. इंडियन काउंसिल ऑन ग्लोबल रिलेशनशी संबंधित एका थिंट टॅक गेट वे हाऊसद्वारा प्रकाशित रिपोर्टनुसार भारतीय स्टार्टअपमधील कंपन्यांमध्ये चीनमधील कंपन्यांची जवळपास ४ बिलियन इतकी मोठी रक्कम गुंतवली आहे. जाणून घेऊयात चीनने गुंतवणूक केलेल्या भारतातील ५ मोठ्या कंपन्या.

१)पेटीएम
पेटीएम ही भारतातील सर्वात पहिली आणि लोकप्रिय भारतीय इ-कॉमर्स आणि मोबाइलद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीची कल्पना, प्रेरणा आणि गुंतवणू चीनमधूनच घेण्यात आली. चीनमधील आघाडीच्या अलीबाबा या कंपनीकडून पैसे मिळवणारी पेटीएम ही पहिली भारतीय कंपनी आहे. यातील गुंतवणूक ही ६२५ मिलियनहून अधिक आहे असल्याचे समजते.

२)हाइक मेसेंजर
स्मार्टफोनसाठी एक क्रॉस प्लॅटफॉर्म इंस्टट मेसेंजिग सेवा देणारे हाइकमध्ये देखील चीनची गुंतवणूक आहे. चीनमधील आघाडीची इंटरनेट सेवा देणाऱ्या Tencent आणि तायवान मधील फॉक्सकॉन टेक्नोलॉजी ग्रुपने पुढाकार घेऊन हाइक मेसेंजर सुरू करण्यात आले. या कंपनीत चीनची जवळपास १.४ बिलियन डॉलर इतकी गुंतवणूक आहे.

३)स्नॅपडील
ही भारतातील सर्वात मोठ्या इ-कॉमर्स कंपनीपैकी एक आहे. यात आतापर्यंत २३ गुंवणूकदारांनी १.५८ बिलियन डॉलर गुंतवले आहेत. यात सॉफ्टबँक, कलारी कॅपिटल, नेक्सस वेंचर्स आणि ईबे इंक यांचा समावेश आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की सॉफ्टबँक ग्रुप ही कंपनी चीनमधील इ कॉमर्समधील दिग्गज अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडमधील सर्वात मोठी शेअर होल्डर आहे.

४)ओला
भारतातील मोबाइल ॲप आधारित वाहतुक सेवा देणारी एक कंपनी आहे. चीनधील दीदी चुइंग या कार ॲप कंपनीने ओलामध्ये गुंतवणूक केली असून आतापर्यंत ओलामध्ये २१ गुंतवणूकदारांनी ८ हजार २०० कोटी रुपये गुंतवले आहेत.

५)गोइबिबो आणि मेक माय ट्रिप
भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीने काही दिवसांपूर्वी इबीबो ग्रुप विकत घेतला. आता एकाच छताखाली मेक माय ट्रिप, गोइबिबो, रेड बस, राइड आणि राइटस्टे असे मोठे ब्रँड एक आले आहेत. Naspers (दक्षिण आफ्रिका) आणि Tencent (चीनी होल्डिंग कंपनी) चे इबीबोमध्ये अनुक्रमे ९१ टक्के आणि ९ टक्के वाटा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment