Thursday, March 23, 2023

सलमान खानच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे ही अभिनेत्री…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा दबंग (सलमान खान) ‘कभी ईद कभी दिवाळी’ चित्रपटाच्या माध्यमातून 2021 च्या ईदनिमित्त चाहत्यांना मोठी भेट देणार आहे. हा चित्रपट जाहीर झाल्यापासून चर्चेत आला आहे. आता ‘कभी ईद कभी दिवाळी’ साठी मुख्य अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.चित्रपट समीक्षक रमेश बालाच्या म्हणण्यानुसार, सलमान खानसोबत त्याच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहेत.अभिनेत्री पूजा हेगडे हिने अभिनेता ह्रितिक रोशनसोबत ‘मोहन जोदड़ो या चित्रपटात काम केले आहे.

अभिनेत्री पूजा हेगडे पहिल्यांदा सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.रमेश बाला यांच्या ट्विटवर त्यांना बऱ्याच कमेंट मिळत आहे आणि आपला अभिप्रायही देत आहेत. साजिद नाडियाडवाला यांच्या निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल. या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये बरीच चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

 

सलमान खान अलीकडेच दबंग 3 मध्ये दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शनही मिळवले आहे. तथापि, नागरिकता दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या निषेधामुळे चित्रपट कमाईच्या बाबतीत अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरला. याशिवाय हा अभिनेता बिग बॉस 13 हा शो होस्ट करत आहे.