हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मेसेजद्वारे अनेक कामं केली जातात. मेसेजद्वारे अनेक महत्वाच्या माहितीची सहजपणे देवाण घेवाण देखील होते. याद्वारे आपल्या भावना व्यक्त करणे हे तर अगदीच सामान्य झाले आहे. अनेक लोकं आपल्या जोडीदाराला प्रेमाचे मेसेजेस पाठवत असतातत. मात्र कोणी तुरुंगातील एखाद्या कैद्याला अशा प्रकारे प्रेमाचे मेसेजेस पाठवत आहे हे तुम्ही कधी ऐकले आहे का ? आणि प्रत्यक्षात जर मेसेजेस पाठविणारा स्वतः पोलीस अधिकारी असेल तर ! नुकतीच अशीच एक घटना इंग्लंडमध्ये उघडकीस आली आहे. जिथे जेलमधील एका कैद्यासोबत चक्क तिथल्या महिला वॉर्डनचेच अफेअर सुरू झाले. या महिलेच्या WhatsApp चॅट मुळे सदर प्रकरण समोर आले. Affair
एका बातमीनुसार, इंग्लंडमधील नॉर्थम्प्टनशायरमध्ये एचएमपी ओनले नावाचे एक जेल आहे. जिथे व्हिक्टोरिया लेथवेट (47) नावाची विवाहित महिला मुख्य वॉर्डन होती. व्हिक्टोरियाचे येथील जेम्स चाल्मर्स नावाच्या एका 30 वर्षीय कैद्यासोबत अफेअर सुरू होते. व्हिक्टोरिया जेम्सला WhatsApp वर अनेक लव्ह मेसेजेस पाठवत असे. ती त्याला लाडाने बेब इन लव्ह असे म्हणत असे. 7 एप्रिल 2021 रोजी जेम्सच्या तुरुंगातून 2 फोन, एक मेमरी कार्ड आणि 4 सिमकार्ड सापडले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.
जेम्सच्या तुरुंगात एक फोन सापडला ज्यामध्ये व्हिक्टोरियाचे मेसेजेस सापडले. या फोनमध्ये व्हिक्टोरिया आणि जेम्सचा एकत्रित असलेला फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नॉर्थम्प्टन क्राउन कोर्टाने आता व्हिक्टोरियाला आठ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे, तर जेम्सची शिक्षा 24 महिन्यांनी वाढवली आहे. व्हिक्टोरियावर विश्वास भंग तसेच आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवला गेला आहे.