आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरते मागे; सदाभाऊ खोत यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. अखेर सरकार कडून कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले. मात्र विलीनीकरणासाठी देण्यात आलेला न्यायालयीन लढा लढतच राहू असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटल.

सरकारने पगारवाढ तर केलीच आहे तसेच ज्या कामगारांचे निलंबन झालं होतं त्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.सरकार दोन पाऊले पुढे आले, पहिला टप्पा आम्ही जिंकलो. आता कोर्टात जो विलीनीकरण चा मुद्दा आहे त्यासाठी आम्ही कामगारांसोबत आहोत असे भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.

यशवंतराव चव्हाण यांनी लालपरी सुरू केली. त्यांनी पहिल्यांदा कराड ते मुंबई एसटी प्रवास केला होता.आज त्यांच्या स्मृतिदिनी कामगारांनी या आंदोलनावर विजय मिळवला याचा आनंद आहे असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटल.कामगार जागा झाला आहे, त्याच्यावर अन्याय केला तर तो उठू शकतो याचा अंदाज सरकारला आला असेल असेही सदाभाऊ म्हणाले.

सरकारने काय केल्या महत्त्वाच्या घोषणा

दर महिन्याच्या 10 तारखेच्या आधी पगार होणार

इतर राज्यांतील कामगारांप्रमाणे पगारवाढ देण्यात आली

मूळ पगारात 5 हजाराने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डीए, एचआर आणि सर्वचं स्लॉटमध्ये पगार वाढ होणार आहे.

कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि सेवा समाप्ती मागे

Leave a Comment