पुणे मनपात नोकरी लावतो या आमिषाने लाखोंना लुटणारा कामगार संघटनेचा अध्यक्ष गजाआड

0
44
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुणे मनपामध्ये नोकरीला लावतो असे म्हणून लाखो रुपयांना लुटणारा कामगार संघटनेचा अध्यक्ष पोलिसांनी गजाआड केला आहे. सतिश वसंत लालबिगे (रा. मंगळवार पेठ, पुणे ) असे त्या आरोपीचे नाव असून या प्रकरणाच्या संदर्भाने पुणे महानगरपालिकेतील मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्याने कार्यवाही करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी  वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कलगुटकर सांगितले कि, या प्रकरणी अनेक लोकांची चौकशी केली जाणार आहे. त्याच प्रमाणे पुणे मनपाच्या अधिकऱ्यांची देखील चौकशी  केली जाण्याची शक्यता आहे.

भारतीय मजदूर संघानेचा पुणे शहराचा अध्यक्ष असणाऱ्या सतिश लालबिगे या आरोपीने आजपर्यत ४३ लाख रुपयांची वेगवेगळ्या लोकांची फसवणूक केली आहे. अशाच फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने पोलिसात धाव घेतल्या नंतर सर्व प्रकाराचे धागेदोरे मिळत गेले. त्यानंतर पोलिसांनी ज्या लोकांची आरोपीने फसवणूक केली आहे. त्या  पिडीत लोकांची यादीत बनवली  आहे. तसेच पोलीस सध्या या  प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here