ऐसी धाकड है धाकड है…; नवरीबाईची ब्युटीपार्लरमध्ये ‘दंगल’ स्टाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या एका नवरीबाईचा एक व्हीडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. तो म्हणजे लेहेंगा आणि दागिने घातलेली नववधू चक्क ब्युटी पार्लरमध्ये पुश-अप्स करताना दिसत आहे. लग्न होण्यापूर्वी नवरीने आपला मेकअप केल्यानंतर दंगल चित्रपटातील स्टाईल मारली आहे.

सध्या सोशल मीडियात या नवरीयाचा दंगल स्टाइलचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमध्ये या वधूने एक वजनदार वधूचा लेहेंगा घातला आहे. याशिवाय अंगावर मोठ्या प्रमाणात दागिने घातलेले आहेत. मेकअप झाल्यानंतर हि नववधू अचानक दोन्ही हात जमिनीवर ठेवून पुश-अप मारण्यास सुरुवात करते. पुश-अप्स मारल्यानंतर ती उभी राहून तिचा बॉडी फिटनेस दाखवते.

नववधूचा पुश-अप मारतानाचा व्हिडिओ दिनेश अकालू या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘फिटनेसची वेगळी लेव्हल! लेहेंगा आणि दागिन्यांमध्ये पुश-अप करताना वधू’, अशा प्रकारे कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आले आहे. या नवरीबाईच्या व्हीडिओला सध्या चांगलीच चर्चा होत आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील आपल्या कमेंट्स केल्या आहेत.