हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबई जवळील विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. हि घटना अत्यंत दुःखद घटना आहे. आग लागल्याने 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अशा प्रकारच्या घटना इतर ठिकाणी घडू नये, याबाबत पुन्हा सूचना दिल्या जातील. रुग्णालयातील घटनेच्या फायर ऑडिट संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमण्याचे जाहीर केलेले आहे. विरारच्या घटनेतील कारण चौकशी समितीतून समोर येईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
शुक्रवारी पहाटे मुंबईतील विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या रुग्णालयाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी संध्याकाळी भेट दिली. तसेच रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाला लागलेल्या आगीची पाहणी केली. तसेच तेथील घटनेबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, मुंबईजवळील विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. अशा प्रकारच्या घटना इतर ठिकाणी घडू नये, यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना युद्धामध्ये दिवस-रात्र लढत आहे. जिल्हा प्रशासन सतर्क असून पूर्ण क्षमतेने काम करत आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना युद्धामध्ये दिवस-रात्र लढत आहे. प्रशासनावर या काळात प्रचंड ताण असला तरी भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल, असे महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले.