हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वर्णिमा कर्ज योजना आणली आहे. या योजनेचा हेतूच महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे असा आहे. ही खास योजना नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सुरू केली आहे. आज आपण या योजनेबाबतच माहिती जाणून घेणार आहोत.
स्वर्णिमा कर्ज योजनेअंतर्गत केंद्र सरकार तीन लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना जास्तीत जास्त दोन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते. या कशावर सरकार दरवर्षी पाच टक्के व्याजदर आकारते. जे सामान्य व्याजदरा पेक्षा खूपच कमी आहे. या योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यानंतर त्याचा ईएमआय प्रत्येक महिन्याऐवजी दर तीन महिन्यांनी भरावा लागतो.
महत्त्वाची कागदपत्रे
या योजनेसाठी मागासवर्गीय महिला गरजू महिला अर्ज करू शकतात. इतकेच नव्हे तर शिक्षणासाठी देखील तुम्हाला हे कर्ज घेता येऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
या वेबसाईटला भेट द्या.
तुम्ही या योजनेअंतर्गत घेतलेली कर्जाची रक्कम आठ वर्षांच्या कालावधीत परत करू शकता. या योजनेसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही १८००१०२३३९९ किंवा www.nbcfdc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या योजनेसाठी