केंद्रीय पथकाने घेतला जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | केंद्रीय पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला उपयुक्त अशा सूचना केल्या. या केंद्रीय पथकामध्ये डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन हे होते.

या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

सातारा येथील जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये व्हेंटेलेटरीची संख्या वाढवावी तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बेडच्या उपलब्धतेची माहिती जनतेला व्हावी यासाठी प्रत्येक कोविड हॉस्पीटलच्या बाहेर बेड उपलब्धतेची माहिती रोजच्या रोज अपडेट करावी. जो भाग कटेन्मेंट जाहीर केला आहे अशा भागात केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रभावी अमंलबजावणी करावी. कोरोना संसर्ग रुग्णाच्या जे-जे संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांची तातडीने कोरोना टेस्टींग करावे, यासह विविध सुचना केंद्रीय पथकातील डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन सुविधा वाढण्यावर भर देत असल्याचे या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group