कोरोना विषाणू बदलतोय आपलं रूप; ब्रिटन मधील संशोधकांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. अनके लोकांचे प्राणही गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटना नेही कोरोना बाबत सतर्क राहण्याचे सल्ले दिले आहेत. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या व्हायरसवर लस शोधण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. अनेक देशातील संशोधक कोरोना साठी काम करत आहेत. ब्रिटनमधील संशोधकांनी कोरोनावर केलेल्या संशोधनातून एक खास गोष्ट समोर आली आहे. संशोधनानुसार, कोरोना विषाणूचे काही उत्परिवर्तन मानवाच्या रोगप्रतिकारक प्रणालीशी संबंधित आहे. हे विषाणू शरीरातील प्रोटीन्सचा प्रभाव कमी करण्यासाठी काम करतात.

मानवाच्या शरीरात असलेली रोगप्रतिकारक प्रणालीशी संबंधित काही प्रोटिन्स असतात. हे प्रोटीन्स कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत करतात.संबंधित संशोधन कोविड-१९ वर प्रभावी लस तयार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तसेच कोरोना विषाणू हळूहळू आपलं रूप बदलतोय असे ब्रिटनमधील युनिवर्सिची ऑफ बाथचे संशोधक एलन राइस यांच्यासह संशोधनात सहभागी असलेल्या संशोधकांचं म्हणणं आहे .

संशोधकांना संशोधनात आढळून आलं की, ‘उत्क्रांतीच्या क्रमात नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार, कोरोना व्हायरस उत्परिवर्तन प्रक्रियेच्या विरोधात पुन्हा लढा देण्यास प्रभावी होतो. त्यामुळे हे संशोधन कोविड-१९ च्या विरोधात नवी लस तयार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.असं सांगितलं जात आहे.संशोधनासाठी वैज्ञानिकांनी जगभरातील १५ हजारांहून अधिक व्हायरस जीनेमचा अभ्यास करून निष्कर्ष नोंदवला आहेत.

संशोधनात सांगण्यात आलं आहे की, कोरोना विषाणूच्या बाबतीत, उत्परिवर्तन प्रक्रिया कमी होऊ शकत नाही. तसेच मानवी शरीरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी किंवा कोरोनाला कमकुवत करण्यासाठी संरक्षक कवच म्हणून उत्परिवर्तनाची प्रक्रिया घडत आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित हे संशोधन ‘मॉलीक्यूलर बॉयलॉजी अँड इवोल्यूशन’मध्ये छापण्यात आलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment