हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे ज्येष्ठ नेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना शनिवारे मध्यरात्री ईमेलवर द्वारे नांदेड येथील संशयित अंकुश शंकरराव सवराते याने धमकी दिली होती. या प्रकरणी संशयितास अटक करण्यात आल्यानंतर आज कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांना नांदेड येथील अंकुश सवराते या व्यक्तीने शनिवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास E-Mail द्वारे धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी काल राजगड येथून रविवारी आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याला आणण्यासाठी कराडचे पोलिसांचे पथक रवाना झाले होते. यानंतर आज संबंधित आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर कराड येथील प्रथमवर्ग न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांच्या कोर्टात त्याला हजर करण्यात आले. यावेळी गुन्ह्याचे तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी हे स्वतः न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी आरोपीला तीन दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना धमकी देणाऱ्या आरोपीस जामीन मंजूर…
आरोपीच्या वकिलांनी केला 'हा' युक्तिवाद पहा.. pic.twitter.com/IXa9RKeV2m— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 31, 2023
आरोपीच्या वतीने ॲड. महादेव साळुंखे यांनी युक्तिवाद केला. पोलिसांनी या गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 आणि भारतीय दंड विधान संहिता कलम 505 ही कलमे लावली आहेत. तथापि, ही कलमे या गुन्ह्यात लागू होत नाहीत. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी न देता जामीन मंजूर करावा, अशी विनंती ॲड. महादेव साळुंखे यांनी केली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांनी आरोपीस जामीन मंजूर केला.