औरंगाबाद – शहरातील एमजीएम विद्यापीठातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची छेड काढल्या मुळे पोलिस पुत्राच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस पुत्राने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित विद्यार्थिनीच्या तीन मित्रांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा शनिवारी मध्यरात्री नोंदवण्यात आला.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमजीएम विद्यापीठातील एक विद्यार्थी नितीन मित्रांसोबत चहा पिण्यासाठी एमजीएम समोरील एका हॉटेलमध्ये गेली होती. त्या ठिकाणी पोलीस पुत्रासह त्याचे दोन मित्र आले होते. विद्यार्थिनीकडे पाहून पोलिस पुत्राने ‘आईटम’ म्हनत वाईट नजरेने पहात इशारा केला. या प्रकाराची माहिती विद्यार्थिनीने सोबतच्या मित्रांना दिली. त्यांनी पोलिस पुत्रासह मित्रांना या प्रकाराविषयी जाब विचारला तेव्हा त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली. या प्रकरणात विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून प्रतीक राजेश भोटकर (20), पियुष चंद्रकांत देशमुख यांच्यासह आणखी एकाचा विरोधात विनयभंगाचा मारहाण धमकी देण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.
दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांचे मित्रांनी मारहाण केल्याची तक्रार प्रतीक भटकर याने केली होती. त्यानुसार तीन अनोळखी मित्रांच्या विरोधात मारहाण धमकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तक्रारीत त्याने भावाला भेटण्यासाठी गेलो असता, अनोळखी आरोपीने गाडीचे कारण सांगून दमदाटी करून मारहाण केल्याचे म्हटले आहे.