पाण्यानी भरलेल्या बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू; घरातले काहीजण TV पाहत होते अन्…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. हि घटना भिवंडीमध्ये घडली आहे. यानंतर भिवंडीतल्या भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दिलकैश अन्सारी असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. भिवंडी शहरातील देव नगर भागामध्ये हि घटना घडली आहे.

कुटुंबातले सगळे सदस्य टीव्ही पाहण्यासाठी हॉलमध्ये बसले होते. त्यावेळी घरातला एक वर्षाचा चिमुकला खेळता खेळता बाथरुममध्ये गेला. यावेळी बाथरुममध्ये पाण्याने भरलेली बादली होती. अचानक या लहानग्याचा तोल गेला आणि तो या बादलीत पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मृत दिलकैश हा भिवंडीतील देवनगर भागातील एका घरात कुटुंबासह राहत होता. घटनेच्या वेळी मृत चिमुकल्याची आई किचनमध्ये जेवण बनवत होती. तर त्यांची इतर मुले घरातील हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होती. यादरम्यान खेळता खेळता हा चिमुकला बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या बादलीत जाऊन पडला आणि त्यामध्ये या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. मृत दिलकैशला सहा भावंडं आहेत तो सगळ्यात लहान होता. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment