नवी दिल्ली । भूक लागल्यावर जर खायला मिळाले नाही तर राग येतो, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. जर आम्ही तुम्हाला सांगितले की, फक्त एक चटणी (McDonald Chicken Nuggets with Sauce) न मिळाल्यामुळे एखाद्याने इतका धिंगाणा घातला की तो थेट तुरूंगातचा पोहोचला, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? यावर विश्वास ठेवा किंवा नाही, अमेरिकेतील एका व्यक्तीने (Robert Golwitzer Jr) असा पराक्रम केला आहे.
Robert Golwitzer Jr नावाचा ग्राहक मॅकडोनाल्डच्या ब्रँचमध्ये गेला आणि त्याने स्वत: साठी चिकन नगेट्स ऑर्डर केली. जेव्हा स्टाफने त्याला ऑर्डर दिली, तेव्हा चिकन नगेट्स मिळाले, परंतु चटणी गायब होती. आता भूक म्हणा किंवा काही त्या व्यक्तीला इतका राग आला की, त्याने रेस्टॉरंटला बॉम्बने उडवून देण्याची धमकीच दिली. या 42 वर्षीय व्यक्तीचे म्हणणे ऐकून कर्मचारी दंगच राहिले.
चटणी न मिळाल्याबद्दल माणसाचा राग
ही घटना अमेरिकेतील आयोवा (Iowa, US) येथील आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास, 42 वर्षीय Robert Golwitzer Jr ने रेस्टॉरंटला कॉल केला. त्याने चिकन नगेट्स देखील ऑर्डर केले. पण खाताना चिकन नगेट्स बरोबर चटणी न मिळाल्याने त्याचा पारा चढला. डिलिव्हरी नंतर त्याने तत्काळ रेस्टॉरंटला कॉल केला आणि स्टाफ मेंबरला मारण्याबरोबरच रेस्टॉरंटला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.
पोलिसांनी अद्दल घडविली
या घटनेनंतर घाबरलेल्या स्टाफ मेंबर्सनी पोलिसांना बोलावून संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी Robert Golwitzer Jr च्या घरी जाऊन त्याला अटक केली. तथापि, नंतर त्याला जामिनावर सोडण्यातही आले. यापूर्वीही मॅकडोनाल्डच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून गोंधळ घालण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. 2018 मध्ये एका व्यक्तीने चुकीची ऑर्डर दिल्याबद्दल येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला फ्रायरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. दुसर्या घटनेत त्या व्यक्तीने कॅश रजिस्टरवर हल्ला केला आणि उशिरा ऑर्डर मिळाल्याबद्दल कर्मचार्यांवर आरडाओरड केली. आणखी एका घटनेत, 45 मिनिटांत ऑर्डर न आल्याने त्या व्यक्तीने ब्रँचमध्ये घुसून गाड्यांची मोडतोड केली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group