हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | धुळे जिल्ह्यात सध्या धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.प्रचार अगदी शिगेला पोहोचला आहे.स्थानिक नेते सगळा परिसर अगदी पिंजून काढत आहेत.अशातच एका ऑडियो क्लिपने खळबळ माजली आहे. जिल्ह्याचे खासदार सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील यांनी साक्री तालुक्यातील आमखेल गावाचे सरपंच ज्ञानेश्वर पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2021 निवडणुकीत इतर शेती संस्था क्रमांक – 2 या जागेवरून सुरेश भामरे हे निवडणूक लढवीत आहेत.त्यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, राजवर्धन कदमबांडे, शिवाजीराव दहिते यांच्या उपस्थितीत काल साक्रीत एक प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी सुरेश भामरे यांनी सभ्यतेची पातळी सोडत लोकांची लायकी काढणारे भाषण केले.तसेच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमवेळी आमखेलचे सरपंच ज्ञानेश्वर पवार यांना धमकवण्याचे काम देखील केले.माझ्या जीवाचे काहीही बरे – वाईट झाले तर सर्वस्वी सुरेश भामरे आणि त्यांचा मुलगा चंद्रजित भामरे जबाबदार राहतील असे त्या क्लिपमध्ये सरपंच पवार यांनी म्हटले आहे.
सुरेश भामरे हे नेहमी अशा उचापात्या करत असतात पूर्वीही त्यांनीं बऱ्याच लोकांना धमकावले आहे.गेल्या वर्षभरापूर्वी त्यांनीं मालपुरचे ग्रामसेवक यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती.त्यावेळी माजी आमदार अनिलअण्णा गोटे यांनी ग्रामसेवकाला अभय देऊन बोलतं केलं होतं पण यावेळी ज्ञानेश्वर पवार यांच्या मागे कोण उभे राहते हे पाहणे औत्सक्याचे ठरणार आहे. तालुक्यात बऱ्याच लोकांकडून हाच प्रश्न विचारला जातोय भामरे यांचा हा “पैशाचा जोर आहे की सत्तेमुळे आलेली मुजोरी”