औरंगाबाद | पाचवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने 9 ऑगस्टला परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते मात्र आता पुन्हा ही परीक्षा 12 ऑगस्टला घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून मिळत आहे.
या परीक्षेसाठी आधी जारी करण्यात आलेले प्रवेश पत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. दरवर्षी पूर्व उच्च माध्यमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसर्या किंवा तिसर्या रविवारी घेण्यात येते. परंतु धोरणामुळे या परीक्षेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. आतापर्यंत या परीक्षेची तारीख सहा वेळा बदलण्यात आली आहे. त्यामुळे सुरुवातीला ही परीक्षा फेब्रुवारी ऐवजी 15 एप्रिल घेण्याचे जाहीर करण्यात आले होते.
त्यानंतर 13 मी 21 जून अशा तारखा बदलत गेल्या. 8 ऑगस्ट ही तारीख निश्चित करून परीक्षा परिषदेकडून सर्व नियोजन करण्यात आले होते. पुन्हा तारीख बदलून नऊ ऑगस्ट करण्यात आली. आता शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 12 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलेजा दराडे यांनी पत्र जारी केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून या परीक्षेसाठी एकूण 2 हजार 516 विद्यार्थी बसले आहेत.