नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसमवेत नवीन इन्कम टॅक्स ई-फाइलिंग पोर्टलमधील तांत्रिक अडचणींबाबत आढावा बैठक घेतली. या दरम्यान नवीन पोर्टलमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. इन्फोसिसनेच इन्कम टॅक्स विभागाचे नवीन ई-पोर्टल तयार केले आहे. या वेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, महसूल सचिव तरुण बजाज, CBDT चे अध्यक्ष जगन्नाथ महापात्रा आणि वित्त मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परंतु, बैठकीबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नाही.
ICAI ने सांगितले की,”नवीन पोर्टलच्या त्रुटी लवकरच दूर केल्या जातील”
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) म्हटले आहे की,” लवकरच तांत्रिक अडचणी सुधारल्या जातील.” या बैठकीत ICAI चे प्रतिनिधीही उपस्थित होते. इन्कम टॅक्स विभागाचे हे नवीन पोर्टल 7 जून 2021 रोजी सुरू करण्यात आले होते, परंतु त्या दिवसापासून बर्याच त्रुटी समोर आल्या आहेत. लॉगिनला अधिक वेळ लागत आहे, आधार व्हेरिफिकेशनसाठी OTP मिळण्यास अडचण आणि मागील वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न देखील त्यात उपलब्ध नाहीत. ICAI ने बैठकीनंतर सांगितले की,” CBDT आणि इन्फोसिसला या संदर्भातील समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आवश्यक माहिती आणि सपोर्ट देण्यास सांगण्यात आले आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या म्हणण्यानुसार हे नवीन पोर्टल करदाता अनुकूल आणि अनुपालन सुधारण्याच्या उद्देशाने तयार केले गेले आहे.
सामान्य करदाता देखील याचा उपयोग रिटर्न भरण्यासाठी करू शकतात
सामान्य करदाता इन्कम टॅक्स विभागाचे हे नवीन ई-फाइलिंग पोर्टल http://www.incometax.gov.in हे त्यांचे वार्षिक रिटर्न (ITR) भरण्यासाठी वापरू शकतात यामध्ये 2020-21 या आर्थिक वर्षात मिळणाऱ्या उत्पन्नासाठी 2021-22 या मूल्यांकन वर्षात रिटर्न भरता येईल. वैयक्तिक करदात्यांसाठी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. इन्फोसिसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अगोदर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले होते की,” ते या समस्यांचे निराकरण करण्याचे काम करत आहेत. काही प्रकरणांमध्ये त्यांना यश देखील मिळाले आहे.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group