असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने सुरू केला एक नवीन उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सरकारने देशातील लाखो मजुरांसाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत तर होईलच, शिवाय त्यांना दर महिन्याला घर चालवण्याच्या तणावातूनही काहीसा दिलासा देखील मिळेल. ‘डोनेट-ए-पेन्शन’ योजनेद्वारे ही सवलत मिळणार आहे.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की,”प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजनेअंतर्गत ‘डोनेट-ए-पेन्शन’ योजना सुरू करण्यात आली आहे. 7 मार्चपासून सुरू झालेली ही योजना 13 मार्चपर्यंत चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत तुम्ही घरकामगार, चालक, घरातील नोकरांसह कर्मचाऱ्यांसाठी काही रक्कम दान करू शकता.”

जाणून घ्या कोणाला सर्वाधिक सुविधा मिळाली
भूपेंद्र यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,”मी माझ्या घरातील माळ्याला पेन्शन दान करून डोनेट-ए-पेन्शन कार्यक्रमाची सुरुवात केली. हा प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजने अंतर्गत एक उपक्रम आहे.” त्यांनी पुढे सांगितले की,”भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आयकॉनिक सप्ताह सुरू करण्यात येत आहे. याअंतर्गत ‘डोनेट अ पेन्शन’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-कामगार रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे.”

कोणकोण रजिस्ट्रेशन करू शकते हे जाणून घ्या
केंद्रीय मंत्री म्हणाले की,”या योजनेअंतर्गत 18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी रजिस्ट्रेशन केल्यास त्यांना वर्षाला किमान 660 ते 2400 रुपये जमा करावे लागतील. इतर कोणीही त्यांच्यासाठी ही रक्कम जमा करू शकतात. पैसे जमा केल्यानंतर, त्यांच्या वयोगटानुसार, 60 वर्षांनंतर, त्यांना पेन्शन म्हणून 3,000 रुपये दिले जातील. यामुळे वृद्धापकाळात त्यांना आरामात जीवन जगण्यास मदत होईल.”

उमंग अ‍ॅपवर ई-श्रमला सुरूवात झाली
या दरम्यान केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्र्यांनी UMANG अ‍ॅपवर ई-श्रम लाँच केले, असंघटित क्षेत्रातील 400 विविध व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या 25 कोटींहून जास्त कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले आहे. अशा मजुरांचे भवितव्य लक्षात घेऊन सरकार आपल्या सरकारी योजनांमध्ये सातत्याने महत्त्वाचे बदल करत आहे.

Leave a Comment