कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
तांबवे (ता .कराड) येथील आठवडा बाजारात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईमध्ये आठवडी बाजारात एका दिवसात तब्बल चार हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तांबवे ग्रामपंचायतीच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. गावामध्ये विनामास्क फिरणारे, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचीही मोहिम ग्रामपंचायतीच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. शनिवारी येथील आठवडा बाजार असतो. आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले. मात्र ज्यांनी मास्क लावले नव्हते.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर उपसरपंच अँड. विजयसिंह पाटील, ग्रामविकास अधिकारी टी.एल.चव्हाण, कर्मचारी संजय राऊत, दिनेश मोगरे, विकास पाटील, सुभाष मदने यांनी संबंधितांकडून चार हजारांचा दंड वसुल केला. ग्रामपंचायतीने अचानक केलेल्या कारवाईने व्यापाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा