हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक उच्च न्यायालयात वर्णावरून दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायलयाने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “आपल्या पतीचा रंग काळा आहे म्हणून त्याचा सतत अपमान करणे क्रूरता समान आहे. तसेच त्याला रंगावरुन डिवचणं अत्यंत चुकीच आहे.” असे उच्च न्यायालयाने म्हणले आहे. न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रकरणात, एका महिलेने पतीचा रंग काळा असल्यामुळे त्याला सोडल्याचे तसेच त्याचा सतत अपमान केल्याचे उघडकिस आले आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने संबंधित पतीच्या बाजूने निकाल दिला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याची याचिका पतीकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने घटस्फोटाची मागणी मान्य करत, महिलेने पतीवर लावलेले आरोप खोटे आहेत. पतीचा रंग काळा असल्यामुळे तिला लग्नात रस राहिला नाही. त्यामुळे ही बाब लपवण्यासाठी तिने त्याच्यावर चुकीचे आरोप लावले. ही वस्तुस्थिती निश्चितच क्रौर्यासारखी आहे. असे मत व्यक्त केले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
या प्रकरणातील संबंधित जोडपे बेंगळुरू येथील असून त्यांचे २००७ मध्ये लग्न झाले होते. या दोघांना एक लहान मुलगी देखील आहे. परंतु 2012 मध्ये पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर महिलेने पती आणि सासरच्या लोकांनी विरोधात कलम ४९८ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आपल्यावर सासरकडची लोक अत्याचार करत असल्याचे म्हणत ही महिला माहेरी राहण्यासाठी आली होती. दरम्यान 2017 मध्ये कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.
उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना, न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांच्या खंडपीठाने पतीचे सर्व बाजू ऐकून घेतली. यावेळी, “माझा रंग काळा असल्यामुळे पत्नी माझा सतत अपमान करत असेल. माझ्यावर अनेक आरोप लावण्यात आले. परंतु हा अपमान मी फक्त मुलांसाठी सहन केला.” असे आपली बाजू मांडत पतीने म्हटले. तसेच, कौटुंबिक न्यायालयाने आमचा विवाह मोडण्याचे आदेश द्यावे अशी विनंती पतीने केली. यानंतर न्यायालयाने देखील पतीच्या बाजूने निकाल देत या जोडप्याच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.