शिंदे- फडणवीस सरकारला धक्का; उच्च न्यायालयाने दिली ‘या’ निर्णयाच्या आदेशाला स्थगिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात चार महिन्यापूर्वी झालेल्या सत्ताबदलानंतर शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या अनेक विकासकामांना स्थगिती दिली होती. तसेच कामांचे रद्दचे आदेश काढले होते. मात्र, शिंदे- फडणवीस सरकारच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबतची पुढील सुनावणी सोमवार, 12 डिसेंबर रोजी होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने दिलेल्या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. आर. डी. धनुका व न्यायमूर्ती श्री. एस. जी. दिगे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने शिंदे- फडणवीस सरकारच्या 19 जुलै 2022 व 25 जुलै 2022 रोजींच्या स्थगिती व रद्दच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

आजरा तालुक्यातील बेलेवाडी ग्रामपंचायतीने शिंदे -फडणवीस सरकारच्या या विकासकामाना स्थगिती व विकासकामे रद्दच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. बेलेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने ॲड. एस. एस. पटवर्धन व ॲड. श्रीमती मृणाल शेलार यांनी बाजू मांडली.