धक्कादायक !! राज्यात ‘या’ वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. तर ३८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्र व राज्य सरकारनं लॉकडाउन शिथिल केल्यानंतर राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे सुरूवातीच्या काळात ४० ते ६० वयोगटातील रुग्णांची अधिक होती. मात्र, अनलॉकनंतर ती कमी होऊन दुसऱ्या वयोगटातील रुग्णांची संख्या वाढली आहे.

केंद्रानं व राज्यानं लॉकडाउन शिथिल केल्यानंतर महाराष्ट्रात ३१ ते ४० वयोगटातील करोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. सध्या राज्यात याच वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ३१ ते ४० वयोगटातील रुग्णसंख्या २१.३४ टक्के आहे. राज्य वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या माहितीप्रमाणे ४ जून रोजी या वयोगटातील रुग्णसंख्या २०.५४ टक्के इतकी होती. त्यानंतर ती वाढत गेली.

३१ ते ४० वयोगटानंतर राज्यात ४१ ते ५० वयोगटातील रुग्णांची संख्येचा क्रमांक लागतो. या वयोगटातील रुग्णसंख्या १७.९ टक्के इतकी आहे. तर ५१ ते ६० या वयोगटातील रुग्णांचं प्रमाण १५.९५ टक्के इतकं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’