खाकी वर्दीतील पोलिसांचे माणूसकीचे दर्शन; कोरोनाने मृत्यू पावलेल्या आजीवर केले अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे, जवळची नाती आणि जीवाभावाची माणसं ही आता पोरकी होवू लागली आहेत. अशा संकट काळात ही माणुसकी जपणारी नाती शिल्लक असल्याची प्रचिती काल पंढरपूर तालुक्यातील सांगवी गावात दिसून आली. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या आजीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरातील कोणीच नसल्याने शेवटी करकंब येथील खाकी वर्दीतील पोलिसांनी त्या मृत आजीवर अंत्यसंस्कार करून माणूसकीचं दर्शन घडवले.

ही घटना काल (रविवारी) सांगवी (ता. पंढरपूर) येथे घडली. मृत आजीचे संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित असल्याने सर्वजण पंढरपूर येथे विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल आहेत. त्यामुळे आजीच्या अंत्यविधीसाठी त्यांना जाता येईना. गावात आजीच्या अंत्यविधीकरिता कोणीही पुढे येत नव्हते.

अशा परिस्थितीत करकंब पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे, सिरमा गोडसे, अमोल घुगे आदींनी पुढाकार घेऊन घटनास्थळी धाव घेतली. कोरोनाच्या धास्तीने अंत्यविधीसाठी कोणीही पुढे येत नसल्याने त्यांनी मृताचे जवळचे नातेवाईक सून व जावई यांना बोलावून घेऊन त्यांच्या उपस्थितीत सर्व सोपस्कार पार पाडत स्वतःच अंत्यविधी उरकला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group