सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सनातन हिंदू धर्म परपंरेनुसार गुडीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते. यानिमित्ताने श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांचा माध्यमातून श्री शनैश्वर देवाच्यामूर्तीस शनैश्वर देवस्थान ट्रस्ट सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष हणमंतराव वाघ यांच्या पुढाकाराने न्याय प्रिय आणि कर्माची शिक्कवण देणारे दैवत श्री शनैश्वरास सुमारे 500 किलो द्राक्षाची उत्कृष्ट द्राक्ष आरास करण्यात आली.
विशेष म्हणजे श्री शनैश्वर देवास छपन्न प्रकारचे विविध रुचकर स्वादिष्ट महानवैदय अपर्ण करण्यात येणार आले. यावेळी शनिभक्त एस. बी. पाटील यांच्या पुढाकाराने हा महानैवदय श्री शनिदेवास अर्पण करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांनी नववर्षाच्या पहिल्या शनिवारी तीर्थक्षेत्र श्री सोळशी येथे येऊन विविध उपक्रमांचा लाभ घेतला.
तीर्थक्षेत्र सोळशीतील शनैश्वरच्या मूर्तीस द्राक्षाची आरास अन् छप्पन भोग नैवेद्य pic.twitter.com/anxN3DRqBn
— santosh gurav (@santosh29590931) March 26, 2023
श्रीशनैश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशीचे मठाधिपती शिवयोगी श्री नंदगिरी महाराज यांनी समाजहितासाठी केलेल्या आध्यात्मिक प्रवचनाला भाविकांनी लाभ घेतला. त्यानंतर महाप्रसाद वाटपाचाही लाभ भाविकांनी घेतला. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती.