हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सातारा जिल्हयातील म्हसवड पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली. या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी पतीस अटक केली. धोंडिराम नाना पुकळे (वय ४०, रा. पुकळेवाडी, सध्या रा. रूम नं. १३, तिसला मजला, मालन निवास निवास क्रांतीसुर्यनगर, म्हसवड, ता. माण, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, धोंडिराम याने आपली पत्नी दिपाली हीला चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात डोक्यात डंबेल्स मारुन गंभीर जखमी केले. यादरम्यान तिचे जमीनीवर सांडलेल्या रक्ताचे डाग मुलांना पुसण्यासाठी लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
दिपाली यांचे वडील आबा महादेव कोडलकर (वय ५५, रा. कोडलकरवाडी, ता. माण, जि. सातारा, सध्या रा. कणेर, ता. माळशिरस, जि.सोलापुर) यांनी म्हसवड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी संशयित आरोपीस अटक केली. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार भुजबळ, उपनिरीक्षक वाघमोडे करत आहेत.