हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमध्ये सगळीकडेचे काम सध्या थांबले आहे, त्यामुळे इतर राज्यात अडकलेल्या मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. या दरम्यान, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून एक परप्रांतीय मजूराचा घरी परत येण्याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओच या कामगारांच्या असहायतेची संम्पूर्ण गोष्ट सांगत आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक वडील, एक गर्भवती महिला आणि एक दोन वर्षांची मुलगी हे दिसून येतात . हे सर्वजण हैदराबादमध्ये रोजंदारीवर काम करत होते. परंतु लॉकडाऊनमुळे ठेकेदाराची साईट बंद झाली आणि हे कामगार उघडे पडले.
१७ दिवसात ८०० किमी पायी चालत गावात पोहोचले
या कामगाराने सरकार आणि अनेक लोकांकडे मदतीसाठी विनवणी केली पण कोणीही त्याला मदत केली नाही. त्यानंतर त्याने हैदराबादहून आपला मूळ जिल्हा असलेल्या बालाघाटच्या कुंडे मोहगाव येथे परत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो आपल्या गर्भवती पत्नीसह मुलगीसह पायीच जाऊ लागला. परंतु गर्भवती पत्नीला ८०० किमी पायी प्रवास करणे सोपे नव्हते. १०-१५ किलोमीटर अंतर चालल्यानंतर, त्याने बांबू आणि लाकडाचे तुकडे निवडून एक हातगाडी बनविली. त्या हातगाडीवर त्याने आपली पत्नी धनवंतबाई आणि २ वर्षाची मुलगी अनुरागिनी यांना बसवले आणि प्रवासासाठी पुढे निघाले. अशाप्रकारे, या मजूर कुटुंबाने बालाघाटकडचा सुमारे ८०० किमी हा प्रवास १७ दिवसात पूर्ण केला.
पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना पाहिले तेव्हा त्यालाही दुःख झाले
रामू असे नाव असलेला हा मजूर आपल्या पत्नीसह जेव्हा राजेगाव हद्दीत पोहोचला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला पाहिले आणि त्यांचा हा प्रवास पाहून तेही हादरून गेले. लांजीचे एसडीओपी नितेश भार्गव यांनी सांगितले की बालाघाटच्या सीमेवर आम्हाला एक मजूर आढळला जो आपली पत्नी धनवंतीसह हैदराबादहून पायी जात होता. त्यांच्याबरोबर त्यांची दोन वर्षाची मुलगीही होती जिला हातगाडीच्यासाहाय्याने ओढूत या ठिकाणी आणले होते. आम्ही आधी या मुलीला बिस्किटे दिली आणि नंतर तिला चप्पल आणली. त्यानंतर एका खासगी वाहनात बसवून त्यांना त्यांच्या गावी पाठविले.
एका दिवसात २०० हून अधिक मजूर लांजी येथून परत आले
मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशातील करीमनगरहून लांजी परिसरातील राजेगाव सीमेवरुन दीडशेहून अधिक कामगार परत आले. दिवसभरात ४०० हून अधिक मजूर वेगवेगळ्या हद्दीतून घरी परतले. पोलिसांनी या मजुरांना पूर्वी सीमेवरील केंद्रात आरोग्य तपासणीसाठी पाठवले होते. नंतर लांजीच्या एसडीओपी भार्गव यांनी सीमा ओलांडून पहिल्या महामार्गावर पोहोचून कामगारांच्या भोजन आणि घरी पाठवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या आरोग्य तपासणीनंतर त्या सर्वाना घरी पाठविण्यात आले.
पायातील फोड बरे होण्यासाठी पोलिस मलम तसेच पेन किलर्सचे वाटपही केले जात आहे
सामान्यपणे कठोर वागणारे पोलिस या प्रवासी मजुरांसाठी चप्पल, मलम आणि पेन किलर जेल यांचे वाटप करतानाही दिसून येत आहेत. लांजीचे एसडीओपी राजेगाव चेकपोस्टमध्ये मुलांसाठी बिस्किटे आणि मजुरांसाठी मलमचे वाटप करताना दिसले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.