सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्याचे राजे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजी राजेंचा राज्यसभेला गेम केला असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले होते. शिवसेना पक्षातील नेत्यांनी भाष्यही केले. शिवेंद्रराजेंच्या गेम केल्याच्या वक्तव्यानंतर सातारा येथील लिंबखिंड येथे रविवारी रात्री आ. शिवेंद्रसिंहराजे आणि संभाजीराजे या दोन्ही राजांची खिंडीत धावती भेट झाली.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे आणि सातारचे राजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साताऱ्यात अचानक भेट झाली. याबाबत स्वतः संभाजीराजे यांनी ट्विट तसेच फेसबुक पोस्ट करीत सांगितले. छ. संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अचानक भेट झाली.
महामार्गावर असून सुध्दा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली व आपुलकीने चौकशी केली. आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच वृद्धींगत राहोत, हीच आई भवानी चरणी प्रार्थना !
आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अचानक भेट झाली.
महामार्गावर असून सुध्दा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली व आपुलकीने चौकशी केली. आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच वृद्धींगत राहोत, हीच आई भवानी चरणी प्रार्थना ! pic.twitter.com/4yWzSGUsfW
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 29, 2022
राष्ट्रीय महामार्गावर लिंबखिंड येथे ही धावती भेट झाली असून भविष्यात दोन्ही राजे एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दोन्ही राजेंच्या भेटीने चर्चेला मात्र आता उधाण आले आहे. छ. संभाजीराजे मुंबईच्या दिशेने निघाले होते. तर मतदार संघात कामानिमित्त आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले निघाले होते. मात्र दोन्ही राजेंची खिंडीत भेट अन् गेम झाल्याचे वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात या भेटीला विशेष महत्व दिले जात आहे.