3 वर्षीय चिमुकलीसह आईनं घेतली धावत्या रेल्वेतून उडी; असं काय झालं?

औरंगाबाद : विवाहितेने पोटच्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेने रेल्वेतून उडी मारुन मुलीसह आपल्या आयुष्याची अखेर केली. औरंगाबाद जिल्ह्यात हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 24 वर्षीय महिलेने टोकाचं पाऊल उचललं.

हाती आलेल्या माहितीनुसार, औऱंगाबादमधील पोटूळ रेल्वे स्टेशनच्या जवळ ही घटना घडली आहे. महिलेने स्वतःसोबत 3 वर्षांच्या मुलीचीही जीवनयात्रा संपवली. मायलेकीने रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित महिला आणि तिची मुलगी या औरंगाबाद शहरातील बालाजी नगर भागातील रहिवासी होत्या.

महिलेने कुठल्या कारणास्तव हे टोकाचं पाऊल उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गोंडस मुलीसह महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

विवाहित महिलेने चिमुकल्या मुलीसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेने रेल्वेतून उडी मारुन मुलीसह आपलं आयुष्य संपवलं. औरंगाबाद जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

24 वर्षीय महिलेने औरंगाबादमधील पोटूळ रेल्वे स्टेशनच्या जवळ आत्महत्या केली. महिलेने 3 वर्षांच्या मुलीसोबत आयुष्याची अखेर केली. मायलेकीने रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

संबंधित महिला आणि तिची मुलगी या औरंगाबाद शहरातील बालाजी नगर भागात राहत होत्या. मात्र विवाहितेने नेमक्या कुठल्या कारणामुळे जीवनयात्रा संपवली, हे अजूनही अस्पष्ट आहे. मात्र चिमुरडीसह आईने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.