हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहे. सातारा जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दररोज विविध मार्गाने आंदोलने केली जात असून या आंदोलनास समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंदू एकदा आंदोलन व आरपीआ (आठवले गट) यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे विक्रम पावसकर व आरपीआचे सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी मराठा समाज बांधवांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे विक्रम पावसकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जालना येथे घडलेल्या घटनेचे आम्ही निषेध करत आहोत. मराठा समाजाच्या सदैव पाठीशी हिंदू एकता आहे.
https://fb.watch/mSXEYE1LbP/?mibextid=Nif5oz
यावेळी अशोक गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठा आरक्षणाच्या बाबतीत हिंदू एकता आंदोलन v आरपीआय या दोन्ही गटाकडून समाज बांधवांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी दोन्ही गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
200 दिवस चक्री उपोषणाचा निर्णय
जालना जिल्ह्यातील सराटी येथील लाठीमार नंतर ठिकठिकाणी आंदोलने, रास्तारोको सुरू झाला आहे. अशावेळी आता कराड येथील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत 13 सप्टेंबरपासून 200 दिवस म्हणजेच सहा महिने चक्री उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे तालुक्यातील प्रत्येक गाव व गावातील प्रत्येकजण या उपोषणात सहभागी होणार आहे.