हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारिमुळे संपुर्ण जग मागील काही वर्षांपासून बंद पडलं होतं. आता कोरोनाची तिसरी लाट येऊन गेल्यानंतर सर्वत्र बर्यापैकी गोष्टी सुरु होताना दिसत आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये आता लाॅकडाऊन उठवून संपुर्ण शिथिलता देण्यात आली आहे. मात्र अशात एक हादरुन सोडणारी बातमी समोर येत आहे. भारतात पटना येथे कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला आहे. तिसर्या लाटेतील कोरोना व्हेरियंटोेक्षा हा नवा व्हेरियंट 10 पट अधिक भयंकर असल्यानं सर्वांचिच चिंता वाढली आहे.
गुरुवारी बिहारच्या पटना येथे कोरोनाव्हायरसचा एक नवीन व्हेरियंट (BA.12) सापडला आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (IGIMS) मध्ये ओमिक्रॉनचे नवीन प्रकार आढळून आले असल्याचं राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीमध्ये नमुद करण्यात आलं आहे. BA.12 हा व्हेरियंट तिसर्या कोरोना लाटेट सापडलेल्या BA.2 या व्हेरियंट पेक्षा 10 पट जास्त धोकादायक आहे.
“कोविडची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन, आम्ही कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग सुरू केली होती. तेथे 13 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली होती आणि त्यापैकी एक बी.ए. 12 स्ट्रेन तर उर्वरित 12 नमुन्यांमध्ये BA.2 स्ट्रेन सापडले आहेत.” अशी माहिती IGIMS च्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या HOD प्रा. डॉ. नम्रता कुमारी यांनी दिली आहे.
#IndiaFightsCorona:#COVID19 UPDATE (As on 28th April, 2022)
➡️3,303 daily new cases in the last 24 hours
➡️Daily positivity rate – 0.66%#Unite2FightCorona #We4Vaccine
1/4 pic.twitter.com/2Eo4pnHgRd
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) April 28, 2022
मात्र असं असलं तरी काळजी करण्याची गरज नाही. या नव्या व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. BA.12 हा व्हेरियंट प्रथम युनायटेड स्टेट्समध्ये आढळून आला होता. दिल्लीतही दोन ते तीन प्रकरणे आढळून आली होती. आता पाटण्यात एक प्रकरण समोर आले आहे. मात्र या व्हेरियंटचा प्रसार अद्याप मोठ्या प्रमाणात झालेला नाही. योग्य ती काळजी घेतल्यास आपण याला सहजपणे रोखू शकतो.
भारतातील सद्य कोविड-19 परिस्थिती कशी आहे?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात गुरुवारी 3,303 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आहेत. यामुळे देशातील एकुण कोरोना रुग्णसंख्या आता 4,30,68,799 झाली आहे. तसेच एक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या 16,980 वर पोहोचली आहे.
तब्बल 46 दिवसांनंतर आज प्रथमच एका दिवसात 3,000 एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे ही एक धोक्याची घंटा समजली जात आहे. योग्यवेळी आपण सावध होणे गरजेचे आहे. अन्यथा अशीच रुग्णसंख्या वाढून परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता डावलता येणार नाही.
आज सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, कोविड-19 मुळे मरण पावलेल्यांची एकुण संख्या 5,23,693 वर पोहोचली असून आज यात 39 मृत्यूंची वाढ झाली आहे.
एकूण संक्रमणांपैकी 0.04 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट 98.74 टक्के आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 701 प्रकरणांची वाढ नोंदवण्यात आली आहे.