जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हात आज दिवसभरात 205 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता 6167 झाली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 198 रूग्णांनी कोरोना वर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3740 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 2092 रूग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत 335 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर ५६, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ १६, अमळनेर ८, चोपडा ९, पाचोरा ६, भडगाव १, धरणगाव २२, यावल ७, एरंडोल २३, जामनेर ५, रावेर ११, पारोळा १५,बोदवड ५, मुक्ताईनगर ७, चाळीसगाव ४ अशी रूग्ण संख्या आहे.
जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्ण संख्येने आज सहा हजारांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील कोरोना साखळी अजूनही तुटली नसून नागरिकांनी लॉकडॉऊनचे काटेकोर पणे पालन होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.
सध्या जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्रात टाळेबंदी घोषित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांनी पुन्हा ह्या तीन क्षेत्रांसाठी नवीन नियमावली आज पुन्हा निर्देशित केली आहे. सदर नियमावली ही पुढील आदेश येईपर्यंत लागू ठेवण्यात येणार आहे.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 198 रूग्णांनी #कोरोना वर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत 3740 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 2092 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 205 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 6167 झाली असून आतापर्यंत 335 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. pic.twitter.com/HKkHSsewlC
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 13, 2020
#unlock नंतर #जळगाव जिल्ह्यात हे राहणार सुरू व बंद. जिल्हाधिकारी @abhijitraut10 यांनी केले आदेश निर्गमित #घरीचरहासुरक्षितरहा #stayhome #lockdown #WarAgainstVirus pic.twitter.com/CpNGzbB5hF
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 13, 2020