व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अबब ! ‘या’ बकऱ्यासाठी मालकाने मागितले चक्क एक कोटी रुपये, त्यामध्ये काय खास आहे ते जाणून घ्या

मुंबई । महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात टायगर नावाचा एक बोकूड आजकाल बराच चर्चेत आहे. या बोकडाच्या गुणवत्तेमुळे त्याला पाहण्यासाठी अनेक लोकं खूप लांब लांबून येत आहेत. हा बोकूड विकत घेण्यासाठी आतापर्यंत 36 लाखांची बोली लावण्यात आली आहे, पण टायगरचा मालक त्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी करत आहेत.

त्याच्या मालकास देखील टायगरच्या गुणवत्तेबद्दल माहिती नव्हती. बकरी ईद पूर्वी टायगरचा मालक जेव्हा त्याला बाजारात विकायला गेला, तेव्हा खरेदीदारांनी त्याची बोली 36 लाखांवर ठेवली. या बोलीनंतर टायगरचा मालक त्याला घेऊन परत आला. टायगरचा मालक सांगतो की,” या बोकडासाठी कोणी एक कोटी रुपये दिले तरच तो टायगरला विकेल. सध्या या बोकडासाठी लोकं 51 लाख रुपयांपर्यंत देण्यास तयार आहेत.”

टायगरची खास गोष्ट म्हणजे हा बराच मोठा बोकूड आहे. याच्या सामर्थ्याचा अंदाज अशाप्रकारे घेता येतो की, त्याला हाताळण्यासाठी दोन लोकांची आवश्यकता भासते. याशिवाय सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जन्मजात त्याच्या शरीरावर ‘अल्लाह’ असे लिहिलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याला विकत घ्यायचे आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group