हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांचा घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होते. सुपे यांची कालपासून चौकशी करण्यात आल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली असून तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आल्यानंतर त्यांची आज कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान त्यांना आज कोर्टासमोर आज हजर करण्यात आल्यानंतर कोर्टाने त्यांना 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, 2020 मध्ये जी शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यावहार झाला होता. तो व्यवहार तुकाराम सुपे यांच्या पुढाकाराने झाला होता. राज्यातील 2020 च्या शिक्षक पात्रता परीक्षेत जे उमेदवार ठरले होते त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवले आणि त्यांना नोकरीत घेतलं अशा प्रकारची गोष्ट पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली होती. त्यामुळे तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.