हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फोन टॅपिंग आणि पोलिसांच्या बदल्या प्रकरणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली. त्यांनतर फडणवीस उद्या पोलीस स्टेशनमध्ये जबाबासाठी जाणार होते. मात्र आता स्वतः पोलिसच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांच्या जबाबाची नोंद घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या जबाबासाठी पोलीस स्वतः त्यांच्या सागर बंगल्यावर जाणार आहेत. गृह खात्याच्या बैठकीत याबाबत चा निर्णय झाला असल्याचे समजते. भाजपनं बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात.
जयहिंद, जय महाराष्ट्र !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 12, 2022
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत म्हंटल की, सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !