व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सिरमच्या ‘कोविडशिल्ड’ लसीची किंमत झाली कमी, पहा काय असेल दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असताना लसीकरण हा मुद्दा महत्त्वाचा बनला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने देखिल लसीकरणावर भर द्यायचे ठरवले आहे. अशातच पुण्यात तयार होणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कॅव्हिडशील्ड या लसीची किंमत आता कमी केल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विट करून दिली आहे.

याबाबत सिरम इन्स्टिट्यूट आदर पूनावाला यांनी लिहिले आहे की, कॅव्हिडशील्ड लसीची किंमत शंभर रुपयांनी कमी करण्यात आली आहे. राज्य सरकारला ही लस 400 रुपयांना मिळणार होती मात्र आता ही लस प्रति डोस किंमत कमी करण्यात आली असून ती तीनशे रुपये करण्यात आली आहे.

दरम्यान ही दिलासादायक बाब असून राज्य सरकारनं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे ते लसीकरण येत्या 1 मे पासून सुरू होणार आहे. आणि 18 वर्षांवरील व्यक्तींकरिता हे लसीकरण केलं जाणार आहे. त्यासाठी नोंदणी देखील आजपासून सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या कॅव्हिडशील्ड लसीच्या मागणीसाठी सिरम ला पत्र लिहिल्याचे सांगितले होते.

काय होते सिरमच्या लसींचे आधीचे दर

भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य सरकारांना सिरमची कोविडशिल्ड ही लस 400 रुपये प्रति डोसच्या हिशेबानं तर खासगी रुग्णालयाला सिरमची लस 600 रुपये प्रति डोसच्या हिशेबाने देणार असल्याचे म्हंटले होते. एकूण लसीच्या उत्पादनाच्या 50 टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी दिला जाणार आहे. तसेच उर्वरित राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना दिला जाईल अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली होती.

त्यांनी म्हटलं आहे की,’ पुढील दोन महिन्यांमध्ये आम्ही लसींचे उत्पादन वाढ होणार असून लसींची कमतरता भरून काढणार आहे’. अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट कडून देण्यात आलेली आहे.

पुढील पाच महिन्यानंतर कोविड शिल्ड ही लस रिटेल आणि फ्री ट्रेडमध्ये कोणत्याही ठिकाणी उपलब्ध असेल. असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान सिरम च्या कोविडशिल्ड चे दर इतर देशाच्या लसीच्या तुलनेत कमी असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे. अमेरिकेच्या लसीची किंमत भारतीय रुपयांप्रमाणे 1500 रशियन लसीची किंमत 750 रुपये आणि चिनी लसीची किंमत ही 750 रुपये असल्याचं सिरमने म्हटलं होते .