व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कंगनामुळे करिना बसणार घरी; सीता मातेच्या भूमिकेसाठी कंगनाला कास्ट करण्याची निर्मात्यांची तयारी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलौकिक देसाई यांच्या सीता या आगामी पौराणिक चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सध्या चुरशीची लढत सुरु आहे. आधी सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान दिसणार असल्याची चर्चा जोरावर होती . मात्र यामुळे करीना ट्रॉल देखील झाली आणि वादाच्या भोवऱ्यातही सापडली. त्याच झालं असं कि या भूमिकेसाठी तिने १२ कोटीची मागणी केल्याची चर्चा झाल्याने लोक संतापले. सोशल मीडियावर यामुळेच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शिवाय बरजंग दलानेही तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतोच, असा धमकीवजा इशारा तिला दिला. मग काय करीना पुन्हा एकदा गाजागोजा गुंडाळून गप्प बसली. त्यानंतर आता निर्माते करिनाऐवजी कंगना राणौतला चित्रपटात कास्ट करू इच्छित आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे लेखक के. व्ही. विजयेन्द्र प्रसाद यांना कंगना या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी योग्य असल्याचे वाटत आहे. त्यामुळे सीता मातेच्या भूमिकेसाठी त्यांची ती पहिली पसंत आहे. मात्र अद्याप मेकर्सने कास्टींगबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

तरीही चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, मेकर्सने कधीच या चित्रपटासाठी करिना कपूरशी संपर्क साधला नव्हता. मात्र तरीही चर्चा कुठून झाली हे मेकर्सला माहित नाही. मात्र या चर्चांना आलेल्या उधाणामुळे करिनाला सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि अनेको लोकांच्या संतापला सामोरे जावे लागले.

करिना कपूर खान हि सीता मातेची भूमिका साकारणार, अशी चर्चा सुरू होताच सोशल मीडियावर संतापाचे वातावरण निर्माण झाले असता, अनेकांनी तिला अर्वाच्य भाषेत ट्रोल केले. काहींनी तर करिनाला सीता मातेच्या भूमिकेत घेतले तर आम्ही हा चित्रपट हाणून पाडू, चित्रपटावर बहिष्कार टाकू आणि तिलासुद्धा बॉयकॉट करू अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.

दरम्यान इ टाईम्सच्या वृत्तानुसार नागपूरमधील बजरंग दल कार्यकर्त्यांनी करीनाविरुद्ध जिल्हाधिका-यांकडे निवेदन दिले होते. करीना कपूरसोबत हा चित्रपट तयार झाला, तर आम्ही त्यावर बंदी घालू असे त्यांनी निवेदनात म्हटले होते. आपल्या निवेदनासोबत त्यांनी करीनाचे काही बिकिनी फोटो आणि ती अजमेर दरगाहला गेलेली असतानाचे फोटो देखील जोडले होते. त्यामुळे आता कुणीही ठरवले तरी करीनाचे सीता मातेच्या भूमिकेत दिसणे शक्य नाही हेच काय ते खरे.