अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा डाव फसला; तरुणीने दोन हात करत केलीस्वतःची सुटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। देशात सध्या  अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. अगदी ४ वर्षाच्या चिमुरडीपासून ते ६० वर्षीय महिलांपर्यंत या अत्याचाराच्या घटनांचा बळी ठरत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना साताऱ्यातील पाटण तालुक्यात घडली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांशी दोन हात करीत विद्यार्थिनीने आपली सुटका करुन घेतली आहे. परंतु या तरुणांशी झटपट करत असताना हि तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

तरुणीने दाखवलेल्या धाडसाचे सर्वच स्थरांतून कौतुक करण्यात येत आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, ही विद्यार्थिनी सकाळी साडेआठ वाजता शाळेत जात असताना, शाळेपासून ५०० मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला तोंडाला मास्क घालून दोन तरुण त्याठिकाणी आले आणि त्यांनी तिला ओढयामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. या वेळी या तरुणीने विरोध केला असता तिच्यावर धारदार शास्राने हल्ला कार्नाय्त आल्याचीही माहिती समोर अली आहे.

परंतु या धाडसी तरुणीने त्या नराधमांशी दोन हात करून त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेत, जवळच असलेल्या ऊसतोड कामगाराच्या झोपड्यांकडे धाव घेतली व त्यांच्या मदतीने आपल्या आईवडिलांना फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यानंतर या तरुणीला उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु दिवसा ढवळ्या अशी घटना घडल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.