मुंबई । राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने सरकारनं रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. मुंबईतील डबेवाल्यांनाही राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी असेल. तर दुसरीकडे शाळा, महाविद्यालये हे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. सिनेमागृह, स्वीमिंग पूल देखील बंदच राहणार आहे. मेट्रोही बंद राहणार राहणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळं खुली करण्याची मागणी होत आहे. मात्र अनलॉक 5 मध्ये देखील धार्मिक स्थळे ही बंद राहणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.
अनलॉक 5 मध्ये या गोष्टींना मिळाली परवानगी
१)अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी
२)राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी
३)ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही
४)डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
५)मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवाव्या
६)पुणे विभागातील लोकलवट्रेन सुरू होणार
अनलॉक 5 मध्ये या गोष्टी राहणार बंदच
शाळा,मेट्रो, धार्मिक स्थळे, सिनेमागृह, स्वीमिंग पूल
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.