कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मलकापूर येथील कन्याशाळेच्या मुलींनी दहावीच्या निकालात बाजी मारत संस्थेची व शाळेची यशाची परंपरा अखंडित ठेवली. विद्यालयाचा निकाल 100 टक्केलागला असून कु.आकांक्षा चव्हाण (96.40 टक्के), कु.अस्मिता पाटील (95.60 टक्के) व कु.मधूरा पाटील (94.40टक्के) या मुलींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत. कु.उत्कर्षा काकडे (94.20 टक्के) हिने चौथा तर कु.वैष्णवी जाधव व काजल कालकर (93.20टक्के) मिळवून दोघींनी पाचवा क्रमांक संपादन केला. तसेच मोलमजुरी करणाऱ्या पालकांच्या कष्टाचे चीज करून साक्षी माने (92.60),करिश्मा राठोड (90.20) वपायल राठोड (88.60), श्रूती वादवणे (88.60) यानींही यश मिळवले. विद्यालयात विशेष प्राविण्यासह 52 मुली, प्रथम श्रेणीत 24 व द्वितीय श्रेणींतून 8 विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
शाळेच्या या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थिंनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वृंदाचे संस्थेचे मार्गदर्शक सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील,संस्थेचे खजिनदार तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका मा.डॉ.स्वाती थोरात , वसंतराव चव्हाण, संजय थोरात, मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.