अन् ट्रक चालक मृत रिक्षा चालकाला रंक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेला; पहा CCTV व्हिडिओ

pune accsident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एक भरधाव रिक्षा एका दुधाच्या ट्रकवर आदळून मोठा अपघात झाला. मात्र या रिक्षाचालकाची मदत करण्याऐवजी ट्रकचालक आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार झाला. इतकेच नाहीतर रस्त्यावर येणारी जाणारी वाहनेदेखील या रिक्षाचालकाच्या मदतीसाठी थांबले नाहीत. यामुळे या रिक्षाचालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. हि घटना पुणे जिल्ह्यातल्या येरवडा येथील विश्रांतवाडी या ठिकाणी घडली आहे. बाबा दादाराव सकट असे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या रिक्षाचालकाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

कशाप्रकारे घडला अपघात ?
बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास या रिक्षाचा आळंदी रस्त्यावरील म्हस्केवस्ती या ठिकाणी अपघात झाला. हि भरधाव रिक्षा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुधाच्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता कि भरधाव रिक्षा जेव्हा ट्रकवर आदळली तेव्हा ट्रक पुढे ढकलला गेला. तर रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

रिक्षाची धडक झाल्यानंतर ट्रकमधील दोघेजण खाली उतरले आणि त्यांनी मागे जाऊन पहिले. यानंतर त्यांनी रिक्षाचालकाला पाहून लगेच घटनास्थळावरून पळ काढला. एवढेच नाहीतर हा अपघात घडला तेव्हा त्या ठिकाणाहून 2-3 दुचाकी सुद्धा गेल्यात पण कुणीही त्या रिक्षाचालकाच्या मदतीला आले नाही. यानंतर या अपघाताची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या रिक्षाचालकाला ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा अपघात नेमका कसा झाले हे अजून समजू शकले नाही. विश्रांतवाडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.