चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी ‘ईतक्या’ फुटांनी वाढणार

aurangabad Airport
aurangabad Airport
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर विस्तारीकरणास कराव्या लागणाऱ्या भूसंपादनाला सुमारे 517 कोटी रुपये लागतील असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवला आहे. ही फक्त जमिनीची किंमत असून बाधित मालमत्तांचे मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भूसंपादनाचा खर्च एक हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ही सगळी प्रक्रिया भूसंपादन नियमाने करायची की वाटाघाटीने याबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.

जमीन मोजणीचे काम आता संपले आहे. चिकलठाणा, मुर्तीजापुर, मुकुंदवाडी येथील 183 एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. नगर भूमापन व भूमी अभिलेख या संस्थांनी संयुक्तपणे भो मोजणी केली आहे. यात 1200 हून अधिक मालमत्ता बाधित होत आहेत. सीटीएस क्रमांक 404 पासून मालमत्ता बाधित होत आहेत.

चिकलठाणा येथील गट नंबर 410, 414, 415, 416, 417 आणि 555 मध्ये मोजणी अंती सीमा ठरल्या आहेत. सध्या धावपट्टी 9 हजार 300 फूट म्हणजेच 2 हजार 835 मीटर आहे. आताही धावपट्टी 12 हजार फुटांपर्यंत विस्तारीकरणाचा प्रस्ताव असून 2700 फुटांसाठी भूसंपादन करावे लागत आहे. 825 मीटर लांबीची धावपट्टी नव्याने करण्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव पुढे आला आहे.