अरेरे…! शूटिंग सुरू होण्याआधीच ‘टायगर 3’चा सेट झाला उध्वस्त; SKF प्रॉडक्शनचे कोट्यवधींचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ या दोघांवर चित्रित होणाऱ्या ‘टायगर ३’ या बहुचर्चित चित्रपटाच्या बिग बजेट सेटचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस असल्यामुळे या सेटला त्याचा मोठा फटका बसल्याचे समोर येत आहे. या चित्रपटासाठी सर्व टीमने प्रचंड मेहनत घेतली होती. पण टीमच्या मेहनतीवर पावसाचे पाणी फिरले आहे. यामुळे मेहनत व्यर्थ आणि नुकसान मोठे झाले आहे. ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या शूटिंग आधीचं सेटचे असे मोठे नुकसान SKF प्रोडक्शन साठी मोठे संकटच झाले आहे. या नुकसानचा निर्मात्यांना मोठा तोटा झाला आहे.

https://twitter.com/EasyWorldNews/status/1402373913657503747

मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन पूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हा बिग बजेट सेट उभारण्यात आला होता. पण कोरोना महामारीचे वाढते थैमान पाहता चित्रपटाचे चित्रीकरण बंद करण्यात आले. आधीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे मोठे नुकसान झाले होते. त्यात आता पावसाची भर पडली आहे.

https://www.instagram.com/p/CP3pl69hk-a/?utm_source=ig_web_copy_link

ई- टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार ‘टायगर ३’ चित्रपटाचा हा सेट दुसऱ्यांदा उभारण्यात आला होता. आधी तोक्ते वादळाने सीटच्या चिंधड्या केल्या. त्यानंतर आता दुसऱ्यांदा सेट तयार करण्यासाठी तब्बल २५० ते ३०० कामगारांची मदत लागली. मात्र लॉकडाऊनमुळे सेटचा उपयोग झाला नाही आणि त्यात आता मुंबईत पावसाने देखील जोर धरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘टायगर ३’ चित्रपटाच्या सेटचे उध्वस्त झालेले रूप समोर दिसत आहे.

सलमान खानच्या टायगर सिरिजचा टायगर ३ हा चित्रपट एक भाग असून त्याच्या चाहत्यांना चित्रपटाबाबत अत्यंत उत्सुकता आहे. या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत सलमान खान सह अभिनेत्री कॅटरिना कैफ दिसणार आहे. इतकेच नव्हे तर बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीदेखील या चित्रपटातील अत्यंत महत्वाची भूमिका साकारणार आहे. टायगर ३ या चित्रपटात इमरान हाश्मी एका क्रूर व निर्दयी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होण्याच्या चर्चा जोरावर होत्या. मात्र चित्रपटाच्या सेटकडे पाहता एकंदर त्याचे यावर्षी चित्रीकरण देखील पूर्ण होईल का….? अशी शंका वर्तविली जात आहे.

Leave a Comment